गंगापूर, (प्रतिनिधी) : लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कांदा बाजारात गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या भावात तब्बल २०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. भाव वाढेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा आठ महिने चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
लासूर स्टेशन येथील बाजार समितीअंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव सुरू आहे. या कांदा लिलावात कांदा घेण्यासाठी चढाओढ होत असल्याने जिल्ह्यातील विविध भागांतून कांदा विक्रीसाठी येत आहे.
उन्हाळी कांदा मार्च महिन्यात निघतो.
शेतकरी टप्प्याटप्याने कांदा विक्रीसाठी आणतात. महागाईमुळे कांदा लागवडीसाठी मोठा खर्च लागतो; मात्र बदलत्या वातावरणामुळे उत्पादन अपेक्षित होत नाही. यामुळे कांद्याला भाव मिळेल या, अशा अपेक्षेपोटी शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवणूक ठेवला; मात्र लाल कांदा निघायची वेळ आली तरी आठ महिने उलटूनही उन्हाळी कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाही. आज ११ नोहेंबर रोजी २ हजार रुपये प्रति क्विंटल विकणारा सुपर कांदा लागवड खर्च वाढला.
उत्पादनातही घट :
महागाईमुळे कांदा लागवडीचा खर्च वाढला असताना बदलत्या असलेल्या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे लासूर स्टेशनच्या विविध भागांतून कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रावसाहेब लांडगे, कांदा उत्पादक.
१ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे. २०० रुपये प्रति क्विंटल भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.












